सोमेश्वर करणार बी हेवी मोलॅसेसपासुन इथेनॉल निर्मिती -पुरुषोत्तम जगताप
कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये इथेनॉल निर्मिती सुरु केली
सोमेश्वर करणार बी हेवी मोलॅसेसपासुन इथेनॉल निर्मिती -पुरुषोत्तम जगताप
कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये इथेनॉल निर्मिती सुरु केली
सोमेश्वर प्रतिनिधी ;बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामामध्ये बी हेवी मोलॅसेसपासुन इथेनॉल निर्मिती सुरु केली असल्याची माहिती श्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्यात तयार केलेल्या व ऑईल कंपनीस जाणा-या पहिल्या इथेनॉल टॅकर पुजन कार्यक्रमाप्रसंगी जगताप बोलत होते.
जगतात पुढे म्हणाले की, कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये इथेनॉल निर्मिती सुरु केली असुन या हंगामात एकुण ५० लाख लिटर इथेनॉल पुरवठा करणेचे टेंडर कारखान्याने भरलेले आहे. या प्रकारच्या इथेनॉलसाठी शासनाने प्रति लिटर रु.५७.६१ दर जाहिर केला असुन सदर इथेनॉलचे बील पुरवठा झालेनंतर २१ दिवसात मिळणार असल्याने याचा कारखान्यास फायदा होणार आहे.
इथेनॉलला पर्यावरण पुरक इंधन म्हणुन शासनाची मान्यता असल्याने यापुढील काळात इथेनॉलची मागणी वाढणार आहे त्याचप्रमाणे ऑईल कंपन्यांची संपुर्ण देशासाठी ४६५ कोटी लिटर्स इथेनॉलची मागणी असल्याने शासनाने १० टक्के इथेनॉल पट्रोल मध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला असुन कारखान्याने ऊसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय निश्चितच आपल्यास फायदेशीर राहील.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शैलेश रासकर, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.