सोमेश्वर कारखाना निवडणुकीत (ब वर्ग) मतदारसंघातून संग्राम सोरटेंच्या रूपाने राष्ट्रवादीस पहिले निर्विवाद यश
आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ‘ब’ वर्गातून दाखल झालेले सर्वच अर्ज माघारी घेण्यात आले.

बारामती वार्तापत्र
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत नेहमी कडवे आव्हान देणाऱ्या शेतकरी कृती समितीसोबत आजपर्यंत भाजपचा गट होता. आता स्वतंत्रपणे भाजपला उमेदवार मिळणार नाहीत व निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर २१ पैकी २० जागांवर उमेदवारी हेच यश मानले जात आहे. सोसायटी (ब वर्ग) मतदारसंघातून मात्र अपयश आल्याने संग्राम सोरटेंच्या रूपाने राष्ट्रवादीस पहिले निर्विवाद यश मिळाले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये ‘ब’ वर्गातून संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संग्राम सोरटे यांना राष्ट्रवादीपुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ‘ब’ वर्गातून दाखल झालेले सर्वच अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.