सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ६३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादीच्या यादीवर नाराज असलेल्यांनी थेट भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ६३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादीच्या यादीवर नाराज असलेल्यांनी थेट भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ४) तब्बल ४३० जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे २० जागांसाठी आता ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तत्पूर्वी, ब गटातून राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ६३१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील ९६ जणांचे अर्ज अपात्र झाले होते. उर्वरित ५३५ उमेदवारी अर्ज शिल्लक होते.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कृती समिती व भाजप या उमेदवारांचा समावेश आहे. शनिवारी (दि. २) बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या. त्यानंतर रविवारी (दि. ३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या यादीवर नाराज असलेल्यांनी थेट भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नाराज प्रत्यक्ष समोर येणार नसले तरी नाराज मतांच्या टक्क्यांच्या फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नाराजांनी भाजपशी संपर्क केल्याने भाजपने आपली यादी प्रसिद्ध करण्यास उशीर लावला. सोमवारी (दि. ४) भाजपने आपली २० उमेदवारांची यादी प्रसिद्ध
केली आहे.