सोमेश्वर’ च्या कामगारांना २९ लाखाचं बक्षीस.
लॉकडाऊनच्या काळात केली अडीच लाख टनाचे उसाचे गाळप.
सोमेश्वर’ च्या कामगारांना २९ लाखाचं बक्षीस.
लॉकडाऊनच्या काळात केली अडीच लाख टनाचे उसाचे गाळ.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कायम आणि हंगामी कर्मचाऱ्यांना कारखान्याच्या वतीने पाच दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देण्यात आला आहे.याबाबत कारखान्याच्या संचालक मंडळाचा मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कारखान्यातील ४०८ कायम कर्मचारी, २२२ हंगामी कर्मचारी यांना तसेच कंत्राटी कर्मचारी या सर्वांनाच पाच दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देण्यात आला आहे. याची रक्कम २९ लाख रुपये होत असून लवकरच ही रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. २७ मार्च ते ३१ मे पर्यंत वेळोवेळी संपूर्ण देशभर केंद्र शासनाने लॉकडाऊन घोषित
केलेले होते. या दरम्यान सोमेश्वर करखान्याच्या सभासदांचा अडीच लाख टनाच्या आसपास ऊस शिल्लक होता. तसेच साखर उत्पादन हे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने या लॉकडाऊन काळामध्ये कारखान्याचे गाळप सुरु राहण्यासाठी कोरोना विषाणूचा धोका पत्करुन अधिकारी, कामगार,
कर्मचारी कामावर येत होते त्यामुळे कारखाना सभासदांचा शिल्लक असणारा ऊस वेळेत
गाळपास आणणे शक्य झाले अन्यथा सभासदांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असते. कारखाना प्रशासनाने या
सर्व बाबी विचारात घेवून ऊस तोडणी यंत्रणेस देणेत आलेल्या बक्षिसाप्रमाणेच कारखान्यातील
कायम/ हंगामी कायम, कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी मजूर अशा
सर्वांना यांना त्यांचे हजेरी प्रमाणे पाच दिवसांच्या पगाराएवढी रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे