सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्ते लावलेला उघडपणे केळ्याच्या भलामोठा फ्लेक्स
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच हा बॅनर पोलिसांनी खाली उतरवला.

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्ते लावलेला उघडपणे केळ्याच्या भलामोठा फ्लेक्स
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच हा बॅनर पोलिसांनी खाली उतरवला.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मेळावा घेत सभासदांना मार्गदर्शन केले होते. या दरम्यान, राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी गर्दी जास्त होती. अर्जही अधिक आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मेळाव्यातच कोणीही रुसू नका कोणाची मनधरणी करणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी लावलेला केळ्याच्या फलकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या अनोख्या फ्लेक्समुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीतला तो नाराज कोण..? याचा शोध सुरु झाला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या वतीने देखील पॅनल उभे करण्यात आले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप या निवडणुकीत सक्रिय झाली आहे. दरम्यान, आज वर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे हे बिनविरोध झाली आहे. त्यामुळे येत्या 12 तारखेला यासाठी निवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह जवळपास साडेतीनशेहून अधिक लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी केवळ 20 जणांना उमेदवारी देण्यात येणार होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली होती. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सोमेश्वर कारखान्यालगत असलेल्या वाघळवाडी परिसरात एकालाही उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पण ही नाराजी उघडपणे व्यक्त करता येत नसल्याने कार्यकर्त्यांनी वाघळवाडीच्या चौकात थेट केळाचे चित्र असलेला भलामोठा फ्लेक्स लावण्यात आला.
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मात्र पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच हा बॅनर पोलिसांनी खाली उतरवला. पण या फ्लेक्सचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि या भागात सध्या याच जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या फ्लेक्समुळे भाजपच्या पॅनलला थोडे बळ मिळाले आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी या नाराज कार्यकर्त्यांचा शोध घेणार का आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याची समजूत घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.