दौंड

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी येथे रोड रॉबरी करून गेल्या २ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस यवत पोलिसांनी अटक

 यवत पोलिसांनी पकडला; दोन वर्षापासून फरार होता आरोपी

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी येथे रोड रॉबरी करून गेल्या २ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस यवत पोलिसांनी अटक 

 यवत पोलिसांनी पकडला; दोन वर्षापासून फरार होता आरोपी

बारामती वार्तापत्र

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी येथे रोड रॉबरी करून गेल्या २ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस यवत पोलिसांनी अटक केली आहे. टिल्या उर्फ आमिर इक्बाल सय्यद असे या रॉबरीतील आरोपीचे नाव आहे. २०१८ पासून फरार असलेला तिसरा आरोपी पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

२०१८ मध्ये दिली होती तक्रार –

२७ ऑगस्ट २०२० रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत वाकडा पूल येथे पुणे – सोलापूर महामार्गावर अक्षय उकिरडे व इतर तीन अनोळखी चोरटे यांनी परशुराम चंद्रशेखर मदने यांना मारहाण केली होती. त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल फोन, ट्रकमधील साऊंड, ड्रायव्हिंग लायसन असा एकूण १९ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे परशुराम चंद्रशेखर मदने यांनी तक्रार दिली होती.

आरोपी नाव बदलून राहत होता –

या गुन्ह्यातील फरारी असलेला आरोपी टिल्या उर्फ आमिर इक्बाल सय्यद (वय 20 वर्ष ) (राहणार- देऊळगाव गाडा, ता -दौंड) हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. तो देऊळगाव गाडा येथील राहुल दगडे यांच्या वीटभट्टीवर वास्तव्यास असल्याबाबतची माहिती यवत पोलीस स्टेशनचे दशरथ बनसोडे व संतोष पंडित यांना मिळाली. आरोपी टिल्या या नावाने वावरत असल्याने तो सापडत नव्हता. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांनी टिल्याचा बारकाईने तपास करून टिल्या हा आमिर असल्याचे खात्री करून त्याला ताब्यात घेतले आहे.

कामगिरी करणारे पोलीस पथक:

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उप अधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस नाईक दशरथ बनसोडे, पोलीस नाईक संतोष पंडित, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब चोरमले, संजय नगरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!