सोशल डिस्टन्स चा फज्जा व दारू खरेदी साठी गर्दी.

सोशल डिस्टन्स चा फज्जा व दारू खरेदी साठी गर्दी.
वाईन्स दुकाना समोर गर्दी,प्रशासनाचे दुर्लक्ष
बारामती:वार्तापत्र सोशल डिस्टनस चा फज्जा उडवत वाईन्स दुकाना समोर दारू खरेदी करण्या साठी गर्दी होते व प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
बारामती शहरातील बाजारपेठा गजबजल्या.. नागरिकांना कोरोनाची कसलीही भिंती नाही.. बारामतीत वाईन्स दुकानासमोरही मद्धप्रेमींची गर्दी रोज सांयकाळी मोठ्या प्रमाणात होत आहे.
बारामती शहरातील बाजारपेठा गजबजलेल्या पहायला मिळाल्यात त्याच बरोबर दारु खरेदीसाठीही मद्यप्रेमींची झुंबड उडवलेली दिसत आहे बारामतीच्या बाजारपेठांमध्येही प्रचंड गर्दी असल्याचं आज पहायला मिळालंय. १३ जूलै नंतर १० दिवसांसाठी पुन्हा लाॅकडाऊन होण्याचा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता .
यामुळे खरेदी करण्यासाठी ही गर्दी केलेली असू शकते.मात्र अशी गर्दी करणे ,सोशाल डिस्टसिंग न पाळणं हे कोरोनाला आमंत्रण ठरु शकते हेही नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.. विशेष म्हणजे बारामतीत आजच कोरोनाचे नवे तीन पाॅझिटीव्ह रुग्ण आढळलेत. तरी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे