सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९६ टक्के निकाल.
बारावी मार्च २०२० बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवले उत्तुंग यश.

सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९६ टक्के निकाल.
बारावी मार्च २०२० बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवले उत्तुंग यश.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा ९६ टक्के निकाल लागला आहे. एच. एस. सी. मार्च २०२० परीक्षेसाठी विद्यालयातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दत्तात्रय केरदेव लोखंडे याने ७५.६८ % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. अर्चना जयवंत खरात हिने ६१.५३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कृतिका अरुण सोनवणे हिने ६१.२३ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. वरील सर्व विद्यार्थ्यांना विजय धेंडे, मेहबूब शेख, प्रेम कडवळे, सागर लोंढे, मनीषा बोधले व सुजाता वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर,डॉ. श्रेणिक शहा,डॉ.लहू कदम पर्यवेक्षक रघुनाथ वाहुळ, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, अध्यक्ष व सदस्य इत्यादींनी अभिनंदन केले.