स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिस स्टेशन ची कारवाई वीज ट्रान्सफार्मचे सुट्टे भाग चोरणारी टोळी गजाआड
जुन्या रेकॉर्ड वरील आरोपींची माहिती घेऊन शोध केला

स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिस स्टेशन ची कारवाई वीज ट्रान्सफार्मचे सुट्टे भाग चोरणारी टोळी गजाआड
जुन्या रेकॉर्ड वरील आरोपींची माहिती घेऊन शोध केला
यवत; बारामती वार्तापत्र
यवत पोलिस स्टेशन गु र नं 196/2021 भा द वी का कलम 461,380 नुसार दि 4/03/2021 दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यात यवत हद्दीतील दोरगे वाडी येथील वैष्णव इलेकट्रीकल कंपनी मध्ये नवीन ट्रान्सफार्म बनवले जात होते सदर ठिकाणी पत्रा शेड चा पत्रा उचकटून सुमारे 12 लाख 288 रु किंमतीचे ट्रान्सफार्म बनवायचे साधन अज्ञात चोरत्यांनी चोरून नेले होते सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना कारखान्यातील cctv फुटेज तसेच येणारे जाणारे रस्त्यावरील cctv फुटेज तपासले तसेच जुन्या रेकॉर्ड वरील आरोपींची माहिती घेऊन शोध सुरू केला असता बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून इसम नामे १) दीपक पांडुरंग खिलारे वय 31 वर्षे रा बी जी शिर्के मुंढवा ,पुणे 36 ,२) दीपक काळा सुतार वय 31 वर्षे रा महंमद वाडी तरवडे वस्ती पोलिस चौकी पाठीमागे पुणे ,३) विजय पोपट शेंडगेवय 28 वर्षे रा महंमदवाडी तरवडे वस्ती पुणे, ४) अरविंद रोहिदास वाघमारे वय 30 वर्षे रा बी जी शिर्के मुंढवा ,पुणे 36 वरील सर्व एसमांची कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे सांगत आहेत वरील चार ही आरोपींना पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे . सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक, श्री डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पो उप निरीक्षक शिवाजी ननवरे ,पो उप निरीक्षक पद्मराज गंपले, पो ना राजू मोमिन ,पो ना विजय कांचन, पो ना दशरथ बनसोडे, पो कॉ संतोष पंडित, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.