“स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडुन यवत येथील ४ प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटलेला दरोडयाचा गुन्हा ७२ तासात उघडकीस
१ कोटी ५४ हजार ५४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त"

“स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडुन यवत येथील ४ प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटलेला दरोडयाचा गुन्हा ७२ तासात उघडकीस
१ कोटी ५४ हजार ५४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त”
क्राईम ; बारामती वार्तापत्र
यवत पोलीस स्टेशन गु.र.नं दि.०३/०८/२०२१ रोजी फिर्यादी नामे १)हितेंद्र बाळासो जाधव, रा. वाघोशी, ता.फलटण, जि.सातारा, यांनी यवत पोलीस स्टेशन येथे तकार दिली की, ते व इतर साक्षिदार यांचे सोबत दि.०२/०८/२०२१ रोजी लातुर ते मुंबई या एस.टी. बस मधुन सोलापुर ते पुणे हायवेरोडने प्रवास करीत असतांना चार अनोळखी आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून एस.टी.बसला गाडी आडवी मारून पास असणारे फिर्यादी व इतर साक्षीदार यांना खाली येवुन त्यांना मारहान व दमदाटी करून त्यांचे ताब्यातील रोख
रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण १,१२,३६,८६०/-रूपये किंमतीचा मुद्देमाल लुटुन नेले बाबत तक्रार दिली होती.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरचा गुन्हा हा वरूडे येथील गणेश भोसले व त्याचा भाउ रामदास भोसले यांनी त्याचे इतर साथीदारांसह केला आहे.
अशी माहीती मिळाल्याने सदर आरोपींचा शोध चालु असतांनाच गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, आरोपी रामदास भोसले हा खराडी बायपास येथे त्याच्या साथीदारांसह पळुन जाण्याच्या तयारीत आहे. म्हणुन स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी तात्काळ खराडी बायपास येथे जाउन आरोपी
१)रामदास भाउसाहेब भोसले ,वय ३० वर्षे रा.वरूडे,ता.शिरूर, जि.पुणे,
२)तुषार बबन तांबे,वय २२ वर्षे, रा.वरूडे,ता.शिरूर,जि.पुणे,
३)भरत शहाजी बांगर ,वय३६ वर्षे,रा.गणेगाव खालसा , ता.शिरूर,जि.पुणे यांना खराडी बायपास येथुन ते पळुन जाण्याच्या तयारीत असतांना ताब्यात घेतले आहे. वरील आरोपी तुषार बबन तांबे यांचेकडुन १,५०,०००/-रूपये, भरत शहाजी बांगर यांचेकडुन ३०,०००/-रूपये, रामदास भाउसाहेब भोसले यांनी त्यांचे उसाचे शेतात लपवून ठेवलेले ९१,०३,०००/- रूपये, असा रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकुण ९२,८४,५४०/-रूपये व सदर आरोपी यांचेकडुन आरोपींनी गुन्हा करतांना वापरलेली स्विफट कार, बुलेट मोटार सायकल, ज्युपीटर मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.असा एकुण १,००,५४,५४०/-रूपये किंमतीची किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील गुन्हयाचा तपास यवत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.