स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून विविध स्पर्धांचे आयोजन
नागरिकांनी सहभागी होण्याचे केलं आवाहन
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून विविध स्पर्धांचे आयोजन
नागरिकांनी सहभागी होण्याचे केलं आवाहन
इंदापूर : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० अभियानाअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेकडून शहरात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केलं आहे.
सदरच्या स्पर्धेत स्वच्छ भारत अभियान, वैयक्तिक स्वच्छता, टाकाऊ पासून टिकाऊ,होम कंपोस्टिंग,कचरा वर्गीकरण,हागणदारीमुक्त शहर,एकल वापर प्लास्टिक बंदी,माझी वसुंधरा अभियान,झाडे लावा झाडे जगवा,स्वच्छ सर्वेक्षण व हरितीकरणामुळे जीवनमानात झालेला बदल या विषयांना अनुसरून पोस्टर आणि चित्रकला स्पर्धा,स्लो सायकल स्पर्धा व फ्लॉगरन, पथनाट्य स्पर्धा, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा तसेच पत्रलेखन स्पर्धा,इन्स्टाग्राम रिल्स,यु ट्यूब शॉर्टस् व जिंगल स्पर्धा,स्वच्छ प्रभाग स्पर्धा, जिल्हास्तरीय स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ( पावर पॉइंट प्रेझेंटेशन ) यांचा समावेश आहे.तसेच शाळा, रुग्णालये,सोसायट्या,ए. मोहल्ला (गल्ली) ,मार्केट,शासकीय कार्यालये,हॉटेल्स यांचा देखील स्पर्धेत सहभाग असणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ प्रजासत्ताक दिना ( २६ जानेवारी ) दिवशी इंदापूर नगरपरिषदेसमोरील प्रांगणात करण्यात येणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी,प्रमाणपत्र व रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८३२९९३५५८४,९४०४६८५५९०,७५८८४४८१७५,७६२०२९८०३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.