स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत
स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत
स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
पुणे : बारामती वार्तापत्र
आज शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता पावसाळी अधिवेशात याबाबत चर्चा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.