स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पुर्ववत करुन ऑनलाईन नोंदणी व्यवहार सुरु
अहमदनगर दि. 4- कोरोना विषाणु (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील दुय्यक निबंधक कार्यालये दि 23 मार्च 2020 पासून दि. 3 मे 2020 पर्यत बंद ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार पुर्ववत सुरु करुन मुद्रांक शुल्क विषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पुर्ववत सुरु करण्याबाबत निर्देशित देण्यात आले.जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय हे कलम 144 चे पालन करुन दिनांक 6 मे 2020 पासून दस्तांची नोंदणी पुर्ववत सुरु करण्याकरिता अर्टी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सह. जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.
.
ज्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यकक्षेतील कंटेन्मेंट झोन घोषीत केलेल्या क्षेत्राचा प्रतिबंधीत कालावधी पुर्ण झाल्यानंतर दस्तांची नोंदणी पुर्ववत सुरु करावी. कार्यलय प्रथमतः सुरु करण्याच्या दिवशी व नंतर किमान प्रत्येक 7 दिवसानंतर संपूर्ण कार्यालयांचे निर्जतुकीकरण करुन घेण्यात यावे. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी कार्यालयासाठी ईस्टेपद्वारे व इतर ठिकाणी ईस्टेप इन किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. इतर कार्यालयात दुरध्वनीवर, समक्ष टोकन, बुकिंगसाठी प्रथम आलेल्यास प्रथम प्राधान्य या तत्वाचा अवलंब करावा. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी आरक्षित वेळेतच कार्यालयात यावे. दस्त छाननी सादरीकरण झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुलीजबाब देण्यासाठी नावाचे क्रमावारीनुसार प्रवेश दयावा. एक दस्तामध्ये जास्त पक्षकार असल्यास एकावेळी जास्तीतजास्त चारच पक्षकाराना आत प्रवेश द्यावा. पक्षकारांनी केवळ फोटो काढण्यापुरता मास्क चेह-यावरुन खाली घ्यावा. प्रत्येक दस्त नोंदणी व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर बायोमेट्रीक उपकरणाचे निर्जतूकीकरण करण्यात यावे. सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयातील कर्मचा-यांना मास्क, ग्लोव्हज , सॅनिटायझर इत्यादी साहित्य पुरेशा प्रमाणात उलपब्ध करुन देण्यात आले असून त्याचा वापर करण्यात यावा.
बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅन्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इत्यादीचे सातत्याने निर्जतूकीरकण करण्यात यावे व कार्यालयातील कर्मचा-यांनी नियमित सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कर्मचा-यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे. कार्यालयात येणा-या नागरिकांना बायोमॅट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी ना्गरिकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. दस्त नोंदणी कार्यालयातील दोन कक्षांमधील टेबलांमधील अंतर किमान 2 मीटर राहील याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांना तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कींग करण्यात यावी. तसेच कमीत कमी पक्षकारांनी दस्त नोदणीस उपस्थितीची दक्ष्ता घ्यावी. आवश्यकता असल्यास पोसिलांची मदत घेण्यात यावी. दस्त नोंदणी कार्यालयात 33 टक्के कर्मचा-यांनी उपस्थित रहावे व दस्त नोंदणी कार्यालयाने एक दस्त नोंदणीसाठी आवश्यक तेवढयाच नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी द्यावी. प्रवेश केलेल्या नागरिकांचे काम झाल्याशिवाय पुढील नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन व्यक्तीमध्ये रांगेत पाच फुट अंतर ठेवावे. तसेच या आदेशाचे उल्लन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 आफ 1980) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.