“हरयाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकऱ्यांवर केलेला क्रूर लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य ;शरद पवारांनी केला निषेध
पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि परिणामी अनेक शेतकरी जखमी झाले.

“हरयाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकऱ्यांवर केलेला क्रूर लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य ;शरद पवारांनी केला निषेध
पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि परिणामी अनेक शेतकरी जखमी झाले.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी केला निषेध –
“हरयाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकऱ्यांवर केलेला क्रूर लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य आहे. शेतकऱ्यांकडून शांततेत विरोध केला जात असतानाही, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि परिणामी अनेक शेतकरी जखमी झाले. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.” अशा शब्दांमध्ये पवारांनी या घटनेचा निषेध केला आहे.
काय आहे प्रकरण?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह भाजपाचे ६ खासदार, ६ राज्यसभा खासदार, १२ आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेल्या उमेदवारांसह संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आले होते. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी बसताडा टोल नाक्यावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.