इंदापूर

हरित इंदापूरसाठी वृक्षारोपण उपक्रम स्तुत्य- अंकिता शहा.

वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी केले वृक्षारोपण.

हरित इंदापूरसाठी वृक्षारोपण उपक्रम स्तुत्य- अंकिता शहा.

वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी केले वृक्षारोपण.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी दीपक शिंदे यांनी आपल्या ४०व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर, स्मशानभूमी, मुख्याधिकारी निवास तसेच कचरा प्रक्रिया केंद्र येथे विविध प्रकारची फुले, फळांची बहुपयोगी झाडे लावून आपला वाढदिवस साजरा केला. हरित इंदापूरसाठी असे उपक्रम स्तुत्य असल्याचे नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी अंकिता शहा म्हणाल्या कि,’ वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी असून पर्यावरण संतुलनासाठी हे महत्त्वाचे आहे. भार्गव मंदिरालगत तसेच टेलिफोन ऑफिस शेजारी विकसित केलेले छोट्या स्वरूपाचे वन यासारखे वन विकसित करण्याकडे आपला प्रयत्न आहे. दीपक शिंदे यांनी अशा प्रकारचा उपक्रम हाती घेऊन विधायक कार्य केले आहे.’

इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल तसेच गटनेते कैलास कदम व इंदापूर कर्मचारी संघटनेचे प्रमुख मोहन शिंदे, सहदेव व्यवहारे, सुरेश सोनवणे, अल्ताफ पठाण, लिलाचंद पोळ,आरोग्य निरीक्षक बारटक्के,अशोक चिंचकर,गजानन पुंडे यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!