हरित व स्वच्छ बारामती साठी कटिबद्ध: देसाई इस्टेट मधील रहिवाशी यांचा उपक्रम.
वृषारोपण व स्वछता मोहीमेस प्रारंभ.
हरित व स्वच्छ बारामती साठी कटिबद्ध: देसाई इस्टेट मधील रहिवाशी यांचा उपक्रम.
वृषारोपण व स्वछता मोहीमेस प्रारंभ.
बारामती:वार्तपत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अजित दादा यांना अभिप्रेत असलेले ‘पर्यावरण व स्वछता मोहीम ‘ या विषयी कार्य हाती घेऊन देसाई इस्टेट येथील श्री गणेश तरुण मंडळ च्या वतीने वृषारोपण कार्यक्रम संपन्न झाला.देसाई इस्टेट मधील ओपन प्लॉट,अमेनिटी स्पेस,रस्त्याच्या कडेला आदी ठिकाणी खड्डे घेऊन पिंपळ,वड,लिंब,आदी झाडांचे वृषारोपण करण्यात आले.
या वेळी स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे,न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे,जळोची चे माजी सरपंच छगन आटोळे,श्री गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल खंडाळे, राहुल वायसे,महेश कोडलिंगे,साहिल शेख,यश बामणे,सूरज शिंदे,शामराव मोहिते,बापूराव जगदाळे आदी मान्यवर व बारामती नगरपरिषद उद्यान विभाग प्रमुख विजय शितोळे,सहायक उद्यान प्रमुख मस्जिद पठाण,जमाल शेख,व उद्यान विभागातील सर्व कर्मचारी उपस्तीत होते.” वृषारपोन करून न थांबता ट्री गार्ड लावणे,खत,पाणी देणे हे कार्य चालू राहणार असून वृक्ष मोठे होऊ पर्यंत काळजी घेणार” असल्याचे हेमंत नवसारे यांनी सांगितले. उपस्तीत सर्वांचे स्वागत व आभार नगरसेवक अतुल बालगुडे यांनी मानले.