कर्मयोगी’कडून इंधन कंपन्यांना इथेनॉल पुरवठ्यास सुरुवात
४८ लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची परवानगी

‘कर्मयोगी’कडून इंधन कंपन्यांना इथेनॉल पुरवठ्यास सुरुवात
४८ लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची परवानगी
कारखान्यातून टँकर रवाना
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ८१ लाख लिटर इथेनॉल पुरवठ्याची निविदा ऑइल कंपन्यांकडे दाखल करण्यात आली आहे.त्यापैकी जवळपास ४८ लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची परवानगी कारखान्यास मिळाली असून पहिले दोन टँकर शनिवारी (दि.१५) रवाना झाले आहेत.
यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,कै. शंकरराव भाऊंनी हा कारखान्याचा प्रकल्प सुरू करताना दूरदृष्टीपुढे ठेवून इथेनॉलची तरतूद केली होती.त्यावेळी याबाबत कोणतेही धोरण नव्हते, शाश्वती नव्हती तसेच खरेदी होत नव्हती परंतु मागील दोन तीन वर्षांपासून इथेनॉल हा प्रमुख व्यवसाय साखर उद्योगांसाठी झालेला आहे त्याचा फायदा कारखान्यास,शेतकऱ्यांना व सभासदांना निश्चित होईल.ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा फायदा करण्याचं धोरण केंद्र सरकारने केल्याने हर्षवर्धन पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार व्यक्त केले.
प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा तसेच संचालक मंडळाच्या हस्ते इथेनॉल टँकरचे पूजन करून चालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.