हर्षवर्धन पाटील यांच्याकडून हजरत चाँदशाहवली बाबांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उरूस साध्यापणाने साजरा
हर्षवर्धन पाटील यांच्याकडून हजरत चाँदशाहवली बाबांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उरूस साध्यापणाने साजरा
बारामती वार्तापत्र
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दि .२३ ते २५ डिसेंबर रोजी तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये जियारत या धार्मीक विधीच्या वेळी दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित राहून चाँदशाहवली बाबांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण केली.
‘ ह. चाँदशाहवली बाबांच्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर मनःशांती आणि सकात्मक उर्जा नेहमीच मिळते. हे ठिकाण हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असून भाईचारा जपण्याचा अनमोल संदेश समाजास मिळतो.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस चालणारा उत्सव रद्द केला आहे.
यावेळी नगरसेवक भरत शहा, नगरसेवक कैलास कदम,भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, जावेद शेख, गोरख शिंदे, ललैद्र शिंदे, इब्राहीम बाबा, शेरखान पठाण, मच्छीद्र शेटे, उरूस कमीटीचे आझाद पठाण, महादेव चव्हाण, हमीदभाई आतार, मुनीर मुजावर, महामुद मुजावर उपस्थित होते.