हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गोतोंडी सोसायटीचे नूतन चेअरमन अरुण नलवडे यांचा सत्कार
उत्तम कारभार करण्याची चेअरमन अरुण नलावडे यांनी दिली ग्वाही.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गोतोंडी सोसायटीचे नूतन चेअरमन अरुण नलवडे यांचा सत्कार
उत्तम कारभार करण्याची चेअरमन अरुण नलावडे यांनी दिली ग्वाही.
इंदापूर:बारामती वार्तापत्र
भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गोतोंडी येथील गौतमेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अरूण नलवडे यांचा आज सोमवारी (दि.9) इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील यांनी सत्कारप्रसंगी अरूण नलवडे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकरनाना नलवडे, माजी चेअरमन कुंडलिक नलवडे, ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सदस्य अशोक कदम, गुरुनाथ नलवडे, नवनाथ नलवडे, जनार्धन नलवडे, प्रा. सुनील सावंत, पोलीस पाटील खाडे उपस्थित होते.
गौतमेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कारभार करू, असे नूतन चेअरमन अरुण नलवडे यांनी सांगितले.