हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरच्या ग्रामसेवक युनियनकडून आपल्या मागण्यासाठी निवेदन.
सकारात्मक मार्गाने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे दिले आश्वासन.
हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरच्या ग्रामसेवक युनियनकडून आपल्या मागण्यासाठी निवेदन.
सकारात्मक मार्गाने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे दिले आश्वासन.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन इंदापूर शाखेच्यावतीने आपल्या विविध समस्या व मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामसेवक युनियन पदाधिकाऱ्यांनी प्रशासन सेवेत काम करत असताना येणाऱ्या अडचणी, कोरोना पार्श्वभूमी व आपले विविध प्रश्न तसेच प्रशासनातील वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य याविषयी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो या ठिकाणी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यातून मार्ग काढण्यासाठीची विनंती केली.
यावेळी सकारात्मक मार्गाने या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी युनियनला दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन इंदापूर शाखेचे अध्यक्ष अमोल मिसाळ, सचिव रविंद्र बनसुडे तसेच युनियनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.