हळकुंडा साठी पाच महिने लग्न आडले
बारामती नगरपरिषदेच्या पथदिव्यांची कमाल
बारामती वार्तापत्र
मागील चार पाच महिन्यापासून बारामती नगर परिषदेच्या हद्दीत सतत गजबजलेल्या शिवाजी चौक ते गुणवडी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने चालू होते व पथदिवे ही बंद होते.याविषयी बारामती वार्तापत्र तसेच अन्य प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने सतत आवाज उठवला जात होता. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाले मात्र तेही अजून पुर्ण नाही झाले. त्याचबरोबर पथदिव्यांच्या कामास सुरुवात झाली मात्र पथदिवे चालू करत असताना दोन खांबाच्या मधील गाळ्यातील फक्त केबलच्या तुकडयासाठी हे पथदिवे बंद होते. त्यामुळे या पथदिव्यांची अवस्था हळकुंडासाठी लग्न मोडले अशीच काहीशी झाल्याची चर्चा बारामती शहरात सुरू आहे.
नावाजलेली नगरपालिका म्हणून बारामती नगरपालिकेकडे पाहिले जाते. मात्र या नगरपालिकेची विकास कामं करत असताना काही उणिवा राहिल्या तर त्याकडे मात्र लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही असे दिसते. कारण चार पाच महिने रस्त्याचे काम अपुर्णच आहे आणि त्यातही एका केबलच्या तुकड्या वाचुन पथदिवे बंद होते याची चर्चा शहरात नागरिक करत आहेत. वास्तविक पाहता ठेकेदाराने किंवा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाईट कोणत्या कारणासाठी बंद आहे ते कारण शोधायला पाहिजे होते. केबलचा तुकडा टाकून पथदिवे चालू करायला हवे होते. म्हणजे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले नसते व छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर झाले नसते.
अजूनही ज्या भागातील लाईटचा काही संबंध नाही तेथील निम्म्या भागातील लाईट बंदच आहे. रस्त्याचे काम नसतानाही काही ठिकाणची झाडे तोडण्यात आली आहेत.
मुख्याधिकार्यांना याविषयी वारंवार कल्पना दिली असता कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढली आहे असे उत्तर देत होते पण त्याचाही काही फरक पडला नाही. नगरपालिकेच्या नगराध्यक्षा यांना सांगून सुद्धा नगरपालिकेतील स्टापने आपला हेका कडेला नेला.
मुख्याधिकारी सांगतात समोरच्या भागातील लाईट बंद आहे तरीही किरकोळ कारणावरून ही लाईट चालू होत नाही. नगरपालिकेचे वीज अभियंता हे दोन दिवस बारामतीत तर दोन दिवस इंदापूरला असतात मग कामकाज तरी चालणार कसे. त्या दोन-तीन कामगारांनी या चार पाच महिन्यात काम का केले नाही व काम इतक्या दिवस का थांबवले त्याची विचारपूस कोणी केली का?
या बंद लाईट साठी मटेरियल काय वापरले, त्या दोन कामगारांमुळे इतके दिवस काम बंद होते आणि मग त्यांच्या मनात आल्यावर त्यांनी हे काम केले. अजूनही शिवाजी चौक ते मळद चौक ही लाईट बंदच आहे. त्यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हा परिसर नगरपालिकेच्या दोन माजी,तसेच विद्यमान उपनगराध्यक्ष
विद्यमा उपनगराध्यक्ष, तसेच ,दोन माजी नगरसेवक यांचा वार्ड आहे. सर्वांनी नगरपालिकेचे सीओ, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला, वारंवार सूचना देऊनही या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे.