हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांना साड्या वाटप..!
वस्ताद पप्पू माने मित्र परिवाराच्या वतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले.
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी महिलांना साड्या वाटप..!
वस्ताद पप्पू माने मित्र परिवाराच्या वतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
शिवसेनाप्रमुख हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बारामती शिवसेना शहरप्रमुख वस्ताद पप्पू माने यांच्या वतीने कष्टकरी व शेतमजूरी करणाऱ्या तब्बल ५०० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
दर वर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.पण मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये शिवसैनिकांकडून विविध उपक्रम राबवले जात असतात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो. याच पार्श्वभूमीवर बारामतीत देखील शिवसेनेच्या वतीने व वस्ताद पप्पू माने मित्र परिवाराच्या वतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा समनव्यक भिमराव भोसले (आप्पा ),शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी बारामती अध्यक्षा ज्योती गाडे, महिला कार्यकर्त्या सुनीता खोमणे,सामाजिक कार्यकर्त्या जया गुंदेचा,अरुणा जाधव व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.