हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करून नगरपालिकेने नागरिकांना गणेश विसर्जनास परवानगी द्यावी-सुनील सस्ते.
विरोधी पक्ष नेते यांची नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करून नगरपालिकेने नागरिकांना गणेश विसर्जनास परवानगी द्यावी-सुनील सस्ते.
विरोधी पक्ष नेते यांची नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
बारामती वार्तापत्र
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावर्षी नागरिकांना एकत्र येऊन “अनंत चतुर्दशी”दिवशी गणेश विसर्जन करण्यास मनाई केल्याने तसेच बारामतीमध्ये मुर्ती विसर्जन नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सामुहीक पध्दतीने विसर्जीत करू पाहत असल्यामुळे हिंदु धर्मीयांच्या भावनेचा आदर – सम्मान लक्षात घेऊन जरी कोविड-१९ ची परस्थिती असली तरीही नागरीकांना स्वयंशिस्तीचे पालन करून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग चे नियम घालुन वैयक्तीक रित्या विसर्जनास परवानगी द्यावी तसेच सन २०१८ चा एन्व्हायरलमेंटल फोरम ऑफ बारामती व बारामती नगर परिषद बारामती यांचा गणेश विसर्जनाचा अनुभव पाहता बारामतीकरांच्या मुर्तीची विटंबना होऊ नये.
याकरीता नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पाळन करून मूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी बारामती नगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते सुनील सस्ते यांनी बारामतीचे नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे केली आहे.