स्थानिक

हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग ही काळाची गरज : डॉ अमीर मुलाणी

अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग सेंटर मध्ये व्यसनमुक्ती संदर्भातील उपचार

हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग ही काळाची गरज : डॉ अमीर मुलाणी

अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग सेंटर मध्ये व्यसनमुक्ती संदर्भातील उपचार

बारामती वार्तापत्र

अत्याधुनिक युगामध्ये विज्ञान पुढे गेलेले आहे परंतु मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर जगात आपण सर्वात सुखी आहोत. नैराश्य टाळण्यासाठी व विविध आजार होऊ नये या साठी हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग ही काळाची गरज असल्याचे मत आयुषभारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अमीर मुलाणी यांनी व्यक्त केले.

डॉ. विजयकुमार काळे व डॉ. रवीकुमार काळे या बंधूंच्याअस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग सेंटर चा शुभारंभ सोमवार दि.०७ एप्रिल रोजी डॉ. अमीर मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या महिला शहर अध्यक्षा आरती गव्हाळे, संदीप शहा, महाराष्ट्र डॉटचे मुख्य संपादक संतोष जमदाडे, स्वरा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक दीपक काळे,सक्सेस कि एज्युकेशनचे संस्थापक सचिन बनसोडे, महसूल अधिकारी सुनिता चव्हाण, रूपाली झारगड, फ्युजन डिजिटल ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक किरण पवार, समीर बनकर, काशिनाथ पिंगळे, डिझाईन वर्ल्डच्या संस्थापिका दिपाली सावंत आदी उपस्तीत होते.

अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सलिंग सेंटर मध्ये व्यसनमुक्ती संदर्भातील उपचार तसेच नेचर हेल्थकेअर यासारखे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी डॉ. विजयकुमार काळे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता वाघ यांनी तर आभार डॉ. रविकुमार काळे यांनी मांनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!