हॉटेल उदयच्या मालकाचा प्रामाणिकपणा ! १ लाख ६० हजार रक्कमेसह मौल्यवान वस्तू असणारी बॅग केली परत
बस थांब्यावर प्रवाशाची विसरली होती बॅग

हॉटेल उदयच्या मालकाचा प्रामाणिकपणा ! १ लाख ६० हजार रक्कमेसह मौल्यवान वस्तू असणारी बॅग केली परत
बस थांब्यावर प्रवाशाची विसरली होती बॅग
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव व भिगवण दरम्यान असणाऱ्या हॉटेल उदयच्या मालकाने जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशाकडून विसरून राहिलेली पैशांसह मौल्यवान वस्तू असणारी प्रवासी बॅग संबंधितास परत करत माणुसकी जपली आहे.
सविस्तर हकीकत अशी की,बुधवारी ( दि. २१ ) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण व पळसदेव दरम्यान परिवहन महामंडळाच्या अधिकृत बस थांबा असणाऱ्या र्हॉटेल उदय येथे सोलापूरहुन पुण्याला जाणारी बस जेवणासाठी थांबली होती. त्यावेळी बस मधील प्रवाशी आर.एस. जाधव यांची तब्बल १ लाख ६० हजार रक्कमेसह काही मौल्यवान वस्तू असणारी बॅग विसरली.ही घटना हॉटेलचे मालक लतीफ मुलाणी यांच्या लक्षात आली असता त्यांनी सदरील बॅग आपल्या ताब्यात घेतली व ताबडतोब प्रवाशांची ओळख पटवून परत केली.
या अगोदरही हॉटेल मालक लतीफ मुलाणी व तेथील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सामाजिक भान राखत प्रवाशांना मदतीचा हात दिला आहे.त्यामुळे तिथे येणाऱ्या ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे.