हॉटेल चालकाने प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं ; प्रवासी महिला ठरली ‘लकी’
हॉटेल मालकाने सोने-चांदीसह रोकड असलेली बॅग केली परत

हॉटेल चालकाने प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं ; प्रवासी महिला ठरली ‘लकी’
हॉटेल मालकाने सोने-चांदीसह रोकड असलेली बॅग केली परत
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळण रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ‘लकी’चे मालक नगरसेवक जावेद शेख यांनी जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशांकडून विसरून राहिलेली सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असणारी बॅग परत करत प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे.
सविस्तर हकीकत अशी की,बुधवारी ( दि.२७ ) सोलापूर हुन पुण्याकडे प्रवास करीत असणाऱ्या सुलोचना नारायण कापसे ( रा.के.के मार्केट पुणे ) या इंदापूर बाह्यवळण रस्त्यावर असणार्या हॉटेल लकी येथे जेवणासाठी थांबल्या होत्या.परंतु जेवण करून झाल्यानंतर बॅग हॉटेल मध्येच ठेवून त्या गडबडीने घराकडे परतल्या.परंतु हॉटेल चालक जावेद शेख यांनी तत्परता दाखवत पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने,दहा हजार रुपयांची रोकड व इतर मौल्यवान वस्तू असणारी बॅग आपल्या ताब्यात घेतली आणि खातरजमा करून संबंधित प्रवासी महिलेच्या मुलाकडे परत करत माणुसकीचे दर्शन घडवले.
दरम्यान मौल्यवान ऐवजासह रोकड असणारी बॅग स्वीकारताच सौ.कापसे यांनी गहिवरून हॉटेल चालक जावेद शेख यांना उद्देशून आपण माणूस नसून देव माणूस आहात तुमचे आभार कसे मानावे अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी हॉटेल चालक शेख यांसह कर्मचाऱ्यांचे आभार मानले.