ह.चाँदशाहवली बाबांच्या मजारवर पोलिसांकडून फुलांची चादर अर्पण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही उरूस साध्यापणाने
ह.चाँदशाहवली बाबांच्या मजारवर पोलिसांकडून फुलांची चादर अर्पण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही उरूस साध्यापणाने
इंदापूर : प्रतिनिधी
सर्वधर्म समभावाचे व सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांचा उरूस ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर या काळात साजरा होत आहे.परंपरेनुसार धार्मिक विधी होऊन शनिवारी (दि.११) इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी संदल, गलफ व फुलांची चादर ह.चाँदशाहवली बाबांच्या मजारवर चढवली आणि मुख्य उरुसास सुरुवात झाली.परंपरेनुसार संदल बनवण्याचा मान हा हमीद आत्तार परिवाराकडे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे उरूस साध्या पद्धतीने साजरा होत आहे.यंदा काही प्रमाणावर निर्बंध शिथिल झाले असले तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून उरूस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय कमिठीने घेतला आहे.
इंदापूरचा उरूस म्हंटल की,मोठी आरास असते.शहर व परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह असतो.इंदापूर पंचक्रोशीतील सर्व धर्मीय मोठ्या हर्षो उल्लाहासाणे दर्शनासाठी येतात.मलिदा व नारळ प्रसाद म्हणून दाखविला जातो. तसेच उरुसाच्या अंतिम दिवशी झेंड्याची ग्राम प्रदक्षिणेची सुरुवात शोभेचे दारुकाम व आतिषबाजीत होत असते.रेवड्या खरेदीसाठी झुंबड उडते परंतु यावर्षी देखील भाविकांच्या आनंदावर विर्जन पडल्याचे एकंदरीत चित्र आहे.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त जाफरभाई मुलाणी, मुनीर मुजावर,शकिल मुजावर, महमुद मुजावर, उरूस कमीटीचे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण, मा.नगरसेवक शेरखान पठाण व संदलचे मानकरी हमीदभाई आत्तार यांसह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.