कोरोंना विशेष
१३ कोरोनाग्रस्त, नव्याने दोघांची भर.
अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.
१३ कोरोनाग्रस्त, नव्याने दोघांची भर.
आज सकाळी आलेल्या ११ कोरोनाग्रस्तांनंतर दुपारच्या उर्वरित अहवालात शहरातील एक व तालुक्यातील कुरणेवाडी येथील एक असे दोन कोरोनाग्रस्त आढळले असून एकाच दिवसात आज १३ कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
आज सकाळी ५९ नमुन्यांमधून ११ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १७ नमुने प्रतिक्षेत होते. आता संध्याकाळी त्याचा अहवाल आला असून त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेट मधील ५६ वर्षीय पुरूष रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कुरणेवाडी येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात बारामतीत १३ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.