१ जुलैपासून सलून, पार्लर सुरू होणे शक्य.
अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

- १ जुलैपासून सलून, पार्लर सुरू होणे शक्य.
गेल्या तीन महिन्यापासून राज्यभरातील बंद असलेली सलून आणि पार्लर पुढील आठवड्यात (1 जुलैपासून) सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. येत्या आठवड्याभरात याबाबत सरकार निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांपासून राज्यभरातील सलून आणि पार्लर बंद आहेत. 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली. मात्र, सलून आणि पार्लर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली नाही.
परिणामीनाभिक समाजाचा संयम सुटत चालला. सरकारने महिना 15 हजारांची आर्थिक मदत करावी अन्यथा दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत राज्यभर नाभिक समाजाने आंदोलने केली.
वडेट्टवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असून शारिरीक अंतरासह कारागिर ग्राहकांची पुरेशी काळजी घेणार असतील सलून सुरू करण्यास हरकत नसावी.
मात्र कोरोनासंबंधी सर्व काळजी घेऊन आचारसंहिता व नियमावली तयार करूनच राज्यात सर्वत्र सलून, पार्लर पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल.