१ मे दिनानिमित्त गुणवंत कामगारांचा सन्मान
एकूण आठ जणांचा गुणवंत कर्मचारी
बारामती वार्तापत्र
१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त येथील बस स्थानकातील ८ गुणवंत कामगारांचा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मागील दोन अडीच वर्षाच्या कोरोना काळात यशस्वी कामगिरी केल्याबद्दल बारामती स्थानकातील वाहतूक नियंत्रक यशवंत महादेव झांबरे, सौ. जयश्री तेजस भुजबळ (मोरगाव) यांच्यासह चालक, वाहक तसेच वर्कशॉप मधील कर्मचारी अशा एकूण आठ जणांचा गुणवंत कर्मचारी म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सन्मानाने बारामती बस स्थानकातील सर्व कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.