स्थानिक

१ लाख ३८ हजार रुपये  किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

तब्बल ५ किलो गांजा जप्त- बारामती शहर पोलिसांची कारवाई.

तब्बल ५ किलो गांजा जप्त- बारामती शहर पोलिसांची कारवाई.

बारामती शहर पोलिसांनी दौंड तालुक्यातील राहू येथे कारवाई करत १ लाख ३८ हजार रुपये  किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

YouTube player

शहरातील आमराई भागात ९ जुलै रोजी ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी सुनिता प्रकाश सकट  यांना ताब्यात घेतले होते. तर दीपक प्रकाश सकट, सेवक प्रकाश सकट कारवाई दरम्यान फरार झाले होते. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी पद्मराज गंपले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर फरार आरोपींचा शोध घेतला असता सेवक सकट हा त्याच्या घरी मिळून आला. त्याकडे अधिक तपास केला असता दौंड तालुक्यातील राहू येथील अनिल पंढरीनाथ सायकर यांच्याकडून गांजा आणत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जात सायकर यांच्या मालकीचे जय तुळजाभवानी हॉटेलच्या मागे तंदूरच्या भट्टीत तब्बल १ लाख ३८ हजार रुपये रूपये किंमतीचा ५ किलो १८० ग्रॅम गांजा मिळून आला. सदर आरोपींवर विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी  नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा. फौजदार संदिपान माळी, पोलीस नाईक ओंकार सिताप, पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे, राजेश गायकवाड,सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे,अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड, पो.कॉ.कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!