
माजी सैनिक तुकाराम मखरे यांचे निधन
वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इंदापूर : प्रतिनिधी
माजी सैनिक तुकाराम सिद्राम मखरे यांचे बुधवारी (दि.२६) त्यांच्या राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले.ते ८५ वर्षाचे होते.भारतीय सैन दलात काम करत असताना त्यांनी जम्मू काश्मीर,राजस्थान,पंजाब अशा विविध भारतीय सीमा भागात चोखपणे कामगिरी बजावली आहे.तसेच ते आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित होते.चळवळीतील काम करत असताना त्यांनी सिद्धार्थ गायन पार्टीत पेटी वाद्या बरोबरच गायनाच्या माध्मातून समाजप्रबोधनाचे कार्य केले.त्यांच्या पश्चात एक मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे.