५० पैसे पासुन २० रुपयांपर्यंत सर्व नाणी/नोटा चलनात असल्याचं… स्पष्ट – आर. बी. आय.
50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं स्पष्टीकरण कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.

५० पैसे पासुन २० रुपयांपर्यंत सर्व नाणी/नोटा चलनात असल्याचं… स्पष्ट – आर. बी. आय.
50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं स्पष्टीकरण कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.
दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली नसल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
रिझर्व बँक ऑफ इंडियानं (RBI)काल म्हणजेच गुरुवारी वार्षिक रिपोर्ट सादर केला. ह्या रिपोर्टमध्ये आरबीआयनं कोणते नाणे आणि नोटा किती चलनात आहेत याची माहिती दिली आहे. एवढच नाही तर किती नोटा आणि नाणे जारी केले जातात तेही आरबीआयनं सांगितलं. विशेष म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली नसल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसापासून दोन हजार रुपयाची नोट बंद केल्याची अफवा उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर आरबीआयचं हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे.
आरबीआय रिपोर्टनुसार, रिझर्व बँक Rs2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 हजाराच्या नोटा जारी करते. देशात अनेक ठिकाणी 1 रुपयाचं नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नाही. काही ठिकाणी तर 10 रुपयाचं नाणही घेतलं जात नाही. 50 पैशाच्या नाण्याची तर अवस्थाच विचारु नये. ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.