ॲट्रॉसिटी तपासात बदल करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन : संजय सोनवणे
तहीलदारांना दिले निवेदन
ॲट्रॉसिटी तपासात बदल करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन : संजय सोनवणे
तहीलदारांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या विचाराधीन असल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यामुळे सदरील कायद्यातील तपासाच्या प्रस्तावित बदलाची प्रक्रिया त्वरित रद्द करावी अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पीआरपीचे युवक प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणी यांनी दिला आहे.
सदरील प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांवर अन्याय करणारा आहे,तसेच मूळ कायद्यातील तरतुदींचा भंग करणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात यावा व या दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधिक्षक यांच्यामार्फत अथवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याबाबतचे आदेश कायम राहावेत अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली असून या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले आहे.