अंकिता पाटील व निहार ठाकरे यांच्या विवाहनिमित्त स्वागत समारंभास राज्यभरातून मान्यवरांची हजेरी
- पाटील व ठाकरे कुटूंबीयांकडून स्वागत

अंकिता पाटील व निहार ठाकरे यांच्या विवाहनिमित्त स्वागत समारंभास राज्यभरातून मान्यवरांची हजेरी
– पाटील व ठाकरे कुटूंबीयांकडून स्वागत
इंदापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्या शुभविवाहानिमित्त मुंबईत ताज पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.२८) आयोजित स्वागत समारंभास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.
अंकिता पाटील व निहार ठाकरे यांचा विवाह ताज हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी कोरोनाच्या निर्बंधांमुळे अत्यंत निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर सायंकाळी या विवाहनिमित्ताने ताज हॉटेलमध्ये आयोजित स्वागत समारंभास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, कपिल पाटील व भारती पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई, संजय राऊत, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवर, विजयसिंह मोहिते पाटील, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, आशिष शेलार, माणिकराव ठाकरे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, वैशाली विलासराव देशमुख, खा. सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, सुनील केदार, सतेज पाटील, अमित देशमुख, दत्तात्रय भरणे, शंभूराजे देसाई, वसंत पुरके, राज पुरोहित, अमरीश पटेल, कृपाशंकरसिंह, रोहित पवार, निरंजन डावखरे, भाई जगताप, जयप्रकाश दांडेगावकर, पार्थ पवार, चित्रा वाघ, राम शिंदे, यशवंत माने, धंनजय महाडिक, धीरज देशमुख, रणजीतसिंह मोहिते पाटील, दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे, अविनाश घोलप, धैर्यशील मोहिते पाटील तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, विश्वास नांगरे पाटील आदीसह वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, सहकार, उद्योग, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, माधवी ठाकरे, राजवर्धन पाटील आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.