अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या याच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी, राज्यातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही रडारवर
या छापेमारीच्यावेळी एका व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या याच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी, राज्यातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही रडारवर
या छापेमारीच्यावेळी एका व्यक्तीला ईडीने ताब्यात घेतले आहे.
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत ईडीच्या टीम्सने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीचे छापे मारले आहेत.
NIA ने दाऊद इब्राहिम याच्यावर गुन्हे दाखल केल्यावर त्याआधारे आता ईडीने छापेमारी सुरू केली आहे. मुंबईत आज ईडीने 10 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. हवाला, मनी लाँडरिंग, ड्रग तस्करी या संबंधी हे छापे मारण्यात आलेत. दाऊदच्या निकटवर्तीयांवर हे छापे मारण्यात आलेत. पहाटे चार वाजल्यापासून ईडीने मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकले. एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ईडीने नक्की कोणत्या मालमत्तांवर छापे मारले याची माहिती मिळू शकलेला नाही. परंतु, कारवाईच्या फेऱ्यात आलेल्या व्यक्तीचे दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपासयंत्रणेने (NIA) गेल्या आठवड्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडी आणि एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत. त्यामुळे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तसेच हा राजकीय नेता कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण आहे याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.