अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी अजितदादा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..? जय पवार यांची बारामती नगराध्यक्षपदासाठी चर्चा
"माळेगाव पॅटर्न"राबविणार का?

अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी अजितदादा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..? जय पवार यांची बारामती नगराध्यक्षपदासाठी चर्चा
“माळेगाव पॅटर्न”राबविणार का?
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे बारामतीच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी ते आता “माळेगाव पॅटर्न” राबविणार का, असा प्रश्न स्थानिक राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले मागील निवडणुकीत,“मी माझ्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे हे कुणालाही सांगितले नव्हते.मात्र माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी मोठेपणा दाखवत उद्धव गावडे यांची शिफारस केली होती.”याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केले की,“मी नगराध्यक्षा म्हणून पौर्णिमा तावरे यांची इच्छा नसताना नाव जाहीर केले.
पौर्णिमा वैभव तावरे या बारामती नगर परिषदेतून प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विजयामुळे अजित पवार यांच्या पारंपरिक विरोधकाला मोठा धक्का बसला होता.त्यामुळे त्या काळात तावरे यांचा विजय आणि कार्यशैली ही राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक करत भाषणांतून त्यांना शाबासकी दिली होती.
मात्र,नागरिक व कार्यकर्त्यांमधून असेही मत व्यक्त केले गेले की,एक महिला म्हणून पौर्णिमा तावरे यांना पक्षातील काही लोकांकडून गेल्या पाच वर्षांत प्रचंड त्रास सहन करावा लागला.तरीही त्यांनी पक्षनिष्ठा जपत आपले काम प्रामाणिकपणे केले.
माळेगांव सहकारी साखर कारखान्याप्रमाणे बारामती नगरपालिकेत अंतर्गत गटबाजीमुळे तसा प्रयोग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.बारामतीमध्येही पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे स्वतःच्या मनमानी कारभारामुळे नगरपालिकेत स्वतःच निर्णय घेणाऱ्या पुढाऱ्यांमुळे जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून बारामतीच्या स्थानिक राजकारणात या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही जय पवार यांच्या नावाला पसंती दिल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.आता अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






