स्थानिक

पोलीस दला तर्फे माजी सैनिकांचा सत्कार

शहर व ग्रामीण मध्ये विविध ठिकाणी केलेल्या कार्याचा गौरव

पोलीस दला तर्फे माजी सैनिकांचा सत्कार

शहर व ग्रामीण मध्ये विविध ठिकाणी केलेल्या कार्याचा गौरव

बारामती वार्तापत्र 

जय जवान आजी-माजी सैनिक संघटना यांनी बारामती शहर आणि ग्रामिण परिसरात २०१९ मध्ये विधानसभा व लोकसभेसाठी झालेल्या मतदाना साठी तसेच जगात कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लागु करण्यात आलेल्या संचार बंदिच्या काळात पोलिसांनी केलेल्या आव्हाहनास प्रतिसाद देऊन दिवसरात्र मेहनत करून पोलिस दलास पहिल्या व दुसऱ्या लाटेत स्वेच्छेने निस्वार्थपणाने ६० दिवस सहकार्य केले व अविस्मरणीय असा राज्यात पहिला बारामती मिलिट्री पॅटर्न राबविला. त्या बद्दल (मंगळवार दि. 17 ऑगस्ट रोजी )
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , बारामती पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने आप्पर पोलीस अधिकारी मिलींद मोहिते ,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
श्री नामदेव शिंदे यांच्या वतीने ५० माजी सैनिकांना संघटनेला प्रशंसापत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले .
यावेळी मिलिंद मोहिते व नारायण शिरगावकर व इतर अधिकारी यांनी आजी माजी सैनिक व परिवारांचा आदर केला जाईल असे आश्वासन दिले .
सैनिक १५ ते ३२ वर्षे देशसेवेनंतर सिव्हील लाइफ मध्ये आल्यावर सिव्हील संपर्क नसल्याने त्यांची फसवणुक होते . यात आपले सहकार्य लाभावे असे मत संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, सचिव राहुल भोईटे, कार्याध्यक्ष भारत जाधव, खजिनदार नामदेव सायार, नगरपालिकेतील अतिक्रमण अधिकारी संतोष तोडकर, रमेश रणमोडे, रविंद्र लडकत, शिवनिंगा माळी, अभय भोरात, विलास कांबळे, भारत मोरे, बाळासाहेब तावरे, बिभीषण वणवे, बापू भापकर, अभय निंबाळकर,दिलीप चौधरी आदी आजी माजी सैनिक उपस्तीत होते

फोटो ओळ: पोलीस दलातर्फे आजी माजी सैनिक संघटनेचा सत्कार करताना पोलीस अधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)

Related Articles

Back to top button