अंधश्रद्धा पसरवून महाराजांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई..
वैभव गोसावी(भारती)
अंधश्रद्धा पसरवून महाराजांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई..
वैभव गोसावी(भारती)
इंदापूर:-प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावावर अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करून महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महाराजांचे सातवे वंशज असल्याचा दावा करणारे वडापुरी ( ता. इंदापूर ) येथील वैभव रतन गोसावी ( भारती ) यांनी इंदापूर येथे दिला.
श्री. गोसावी पुढे म्हणाले, काही व्यक्ती व संस्था श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस किंवा मूर्तीस साडी, बांगड्यापरिधान केल्याचे दाखवून प्रतिमा भंजन किंवा प्रतिमा मलिनीकरण करण्याचे काम करत आहेत.
काही व्यक्ती आणि संस्था महाराजांच्या नावा वर खोटी माहिती प्रसारित करून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. महाराजांचा अनुग्रह झाल्याचे सांगून भक्तांना फसवत आहेत. त्यांनी हे प्रकार न थांबविल्यास त्यांच्यावर नाईलाजाने कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
वैभव गोसावी यांनी सोलापूर येथील दिवाणी न्यायालयात ते स्वामी समर्थ महाराज यांचे थेट वंशज असल्याचा दावा केला असून त्यांनी विविध ग्रंथातील खोटा मजकूर छापण्यास देखील मनाई मागितली आहे. वादीच्या परवानगी शिवाय स्वामींच्या नावाचा, मूर्तीचा तसेच समाधी स्थळाचा वापर करू नये असा दाव्यात मनाई हुकूम मागितला आहे. या दाव्यास पुरावा म्हणून त्यांनी अनेक मोडी लिपीतील पत्रे, वंशावळ, जमिनीची कागदपत्रे तसेच जन्ममृत्युच्या नोंदी सादर केल्या आहेत. महाराजांच्या अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसारहोण्या ऐवजी काही जण त्यांच्या नावाचा गैरवापर करत असल्यामुळे ही भूमिका घ्यावी लागल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.