पर्यावरणाची जाणीव जागृती स्वयंसेवकांनी समाजापर्यंत पोहोचवावी- डॉ.भास्कर गटकुळ
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील 100 स्वयंसेवक सहभागी

पर्यावरणाची जाणीव जागृती स्वयंसेवकांनी समाजापर्यंत पोहोचवावी- डॉ.भास्कर गटकुळ
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील 100 स्वयंसेवक सहभागी
इंदापूर प्रतिनिधी –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षण उपक्रमांतर्गत एकदिवशीय पर्यावरण या विषयावरती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आली होती.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भिगवण महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. भास्कर गटकुळ यांनी पर्यावरणाची जाणीव जागृती स्वयंसेवकांनी समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
या शिबिरामध्ये शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती , कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवन , श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा , विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब , इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर मधील एकूण 100 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले.भिगवण महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. भास्कर गटकुळ यांनी पर्यावरण कसे वाचले पाहिजे, प्रदूषण कसे टाळावे ,विविध प्रकारचा धूर ,हा पर्यावरणामध्ये तयार होतो तो मानवी जीवनाला व सजीव सृष्टीला कसा हानिकारक आहे ,प्लास्टिक कसे टाळावे व त्याचे विघटन कसे करावे पर्यावरण आपणास जपावे लागेल आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ते समाजापर्यंत जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप शिंदे यांनी ग्रीन कॅम्पस ,ग्रीन ॲक्ट, याविषयी माहिती देत आपले महाविद्यालय वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यावरण संबंधीत कसे कार्य करीत आहे याविषयीची माहिती दिली.
डॉ. महंमद मुलाणी यांनी पर्यावरण आणि आपण या संदर्भात आढावा घेतला आणि पर्यावरणीय समस्या कशा टाळता आल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
इंदापूर नगरपालिकेचे प्रकल्प अधिकारी सुभाष ओव्हाळ यांनी पर्यावरणचा समतोल राखण्यासंदर्भात माजी वसुंधरा, स्वच्छ व सुंदर पर्यावरण या संदर्भात संपूर्ण स्वयंसेवकांना शपथ दिली तसेच पर्यावरणाची निगा राखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. तानाजी कसबे यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. मनिषा गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. पुरुषोत्तम साठे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी केले.