अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आय कॉलेजच्या दोन खेळाडूंची निवड
प्राचार्य डॉ.संजय चाकणेंनी दिली माहिती
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आय कॉलेजच्या दोन खेळाडूंची निवड
प्राचार्य डॉ.संजय चाकणेंनी दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळ यांचेमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी आय कॉलेजच्या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
पृथ्वीराज नलवडे या खेळाडूची दि. ०४ ते ०७ जानेवारी २०२२ रोजी मेंगलोर, विद्यापीठ मेंगलोर या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ “थाळीफेक” या स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर निशा दुरुगकर या खेळाडूची दि. ०६ ते १० जानेवारी २०२२ रोजी “द आसाम रॉयल ग्लोबल विद्यापीठ, गुवाहाटी या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ “बेसबॉल” या स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे व शारिरीक शिक्षण संचालक डॉ. भरत भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड, डॉ.राजेंद्र साळुंखे, गणित विभागप्रमुख प्रा. बाळासाहेब काळे, कार्यालयीन अधिक्षक अभिमन्यू भंडलकर,मयूर मखरे, प्रा. रुपाली मिसाळ, प्रा, संध्या राऊत व प्रा. भोसले इ. उपस्थित होते.
निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ. भरत भुजबळ, प्रा. बापू घोगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या खेळाडूंचे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे या सर्वांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.