अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विजेते
टीसी महाविदयालयाच्या क्रीडांगणावर रंगल्या आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धा
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विजेते
टीसी महाविदयालयाच्या क्रीडांगणावर रंगल्या आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धा
बारामती वार्तापत्र
सांघिक खेळाचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेच्या विजेतपदाचा मान यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने पुन्हा पटकावला आहे. केरळच्या कालिकत विद्यापीठ संघाला उपविजेतेपद मिळाले.
बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर दिनांक- 20 मार्च ते 22 मार्च दरम्यान अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी देशभरातून 14 विद्यापीठांच्या संघानी सहभाग नोंदवला होता.विजेतेपदासाठी अंतिम चार संघांमध्ये साखळी सामने खेळवले गेले. सर्वोत्तम कामगिरी आणि सर्वाधिक गुणांच्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाला विजेता घोषित करण्यात आले अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहामध्ये पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिपक माने, संचालक, बोर्ड ऑफ स्पोर्टस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर अध्यक्षस्थानी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. मिलिंद शहा वाघोलीकर होते. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मा चंद्र्गुप्त शहा, मा. जे. जे. शहा, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री अभिनंदन शहा, तसेच सर्व उपप्राचार्य पारितोषिक समारंभास उपस्थित होते.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दिपक माने यांनी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचे आय़ोजन करून एक आदर्श निर्माण केला असून खेळाच्या क्षेत्रात आज टीसी महाविद्यालय हे राष्ट्रीय राजदूत असल्याचे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव मा मिलिंद शहा वाघोलीकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये
करियरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांनी आता क्रीडाक्षेत्राकडे एक यशाकडे नेणारे प्रमुख
साधन म्हणून लक्ष देण्याची गरज असल्याचे नमुद केले.
बारामतीमधील निरामय मेडिकल व रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. अशोक देशपांडे यांच्या वैद्यकीय पथकाने खेळाडूंसाठी वैद्यकीय सेवा पुरविली होती. संपूर्ण स्पर्धेचेमध्ये पंच म्हणून कार्य करण्याऱ्या सर्वांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. जवाहर शाह वाघोलीकर, महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. शारीरिक शिक्षक संचालक डॉ. गौतम जाधव, क्रीडा शिक्षक श्री. अशोक देवकर, सुहास ढोरे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आभार प्राध्यापक डॉ. गौतम जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप सरोदे आणि प्रा. स्मिता गोरे यांनी केले.
आखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धांचे निकाल
प्रथम क्रमांक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
द्वितीय क्रमांक- कालिकत विद्यापीठ, केरळ
तृतीय क्रमांक- जम्मू विद्यापीठ, जम्मू
उत्तेजनार्थ- महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक
खेळाडूंची वैयक्तिक बक्षीसे
उत्कृष्ठ खेळाडू महिला (विभागून) – 1)पूजा पांढरे , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
2) वितिशा विन्सेंट, कालिकत विद्यापीठ, केरळ
उत्कृष्ठ खेळाडू पुरुष – नितीन एम, कालिकत विद्यापीठ, केरळ
उद्योमुख खेळाडू – किरण कौर, जम्मू विद्यापीठ, जम्मू