बारामतीत अॅक्टिव्ह सर्वेक्षणात आज १४ जण कोरोनाबाधित
बारामती नगपरीषद व आरोग्य खात्याच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

बारामतीत अॅक्टिव्ह सर्वेक्षणात आज १४ जण कोरोनाबाधित.
बारामती नगपरीषद व आरोग्य खात्याच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ३२हजार जणांचे अॅक्टिव्ह सर्वेक्षण झाल्यानंतर आज ४१ हजार ५२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. १० हजार ९४३ कुटुंबाच्या सर्वेक्षणात १४ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बारामतीत तीन दिवसांपूर्वी अॅक्टीव्ह सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी १८ जण कोरोनाबाधित आढळले होते. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पथकांना ८२ जण संशयित आढळले. त्यांची तेथेच रॅपीड अॅंटीजेन चाचणी केल्यानंतर १४ जण कोरोनाबाधित आढळले. कालच्या तपासणीत बारामतीत १२० जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे आजच्या तपासणीत किती संशयित व किती कोरोनाबाधित आढळतात याकडे बारामतीच्या नागरिकांचेही लक्ष होते.
या सर्वेक्षणादरम्यान संशयितांपैकी ५७ जण निगेटिव्ह आले, मात्र तरीदेखील काही लक्षणे आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यातील ९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बारामती नगपरीषद व आरोग्य खात्याच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले.