राजकीय

अखेर ठरलं…!२ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

'भाऊ'च मुख्यमंत्री होणार, पण कोण?

अखेर ठरलं…!२ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

‘भाऊ’च मुख्यमंत्री होणार, पण कोण?

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरील पडदा आता जवळपास उठला आहे. भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच शपथविधीचा कार्यक्रमही ठरला आहे. मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचवेळी सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते, पण नंतर त्यांची भूमिका मवाळ झाली.

मुंबईत ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

एकनाथ शिंदे यांना गृहखाते स्वत:कडेच ठेवायचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आज सायंकाळी मुंबईत महायुतीचे तीन प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. याशिवाय विधीमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी उद्या भाजप आमदारांची बैठक होऊ शकते आणि नंतर दिल्लीत महायुतीची बैठकही प्रस्तावित आहे.

दरम्यान कालच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी महायुतीची दुसरी बैठक मुंबईत बोलावणार असल्याचे एकनाथ शिंदे सांगितलं आहे. फडणवीस, अजित पवार आणि महायुतीचे इतर नेते अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर शिंदे यांचे हे वक्तव्य आले आहे. गृहमंत्र्यांसोबतची बैठक चांगली आणि सकारात्मक होती, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. ही पहिलीच भेट होती. त्यांनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram