अखेर नरभक्षक बिबट्या ‘ खल्लास ‘
संपूर्ण वनविभागाची टीम बिबट्याच्या मागावर होती.
बारामती वार्तापत्र
मागील महिन्यापासून सोलापूर ,नगर , बीड जिल्ह्यांमध्ये बळी घेणाऱ्या बिबट्याचा अखेर खेळ खल्लास झाला. अनेक लोकांचा बळी घेतल्या मुळे त्याची दहशत निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यभर याविषयी चर्चा चालू होती. शेतकरी शेतात जायला धजवत नव्हता. त्यामुळे शेतीचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले होते .दिवस मावळला की घरातून बाहेर पडायला गावकरी भित होते.
बिबट्याला पकडण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने हेलिकॉप्टर मिळावे अशीही मागणी होत होती. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विधी विभागाचे राज्य अध्यक्ष अॅड तुषार झेंडे पाटील यांनी याविषयी मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यामुळे एकंदरीतच बिबट्या चर्चेचा विषय ठरला होता. सरकारच्या वतीने बारामती येथील नेमबाज, तावरे व अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी वन विभागाच्या या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. संपूर्ण वनविभागाची टीम बिबट्याच्या मागावर होती. वांगी नंबर 2 येथे बिबट्याला केळीच्या बागेत आडवुन धरण्यात आले होते. त्यावेळी बारामतीची नेमबाज तावरे व अकलूजचे डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी तीन गोळ्या झाडून बिबट्याला ठार केले