अखेर बारामती शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत वासियांना मिळाले हक्काचे घर..!
बिरजू मांढरे यांच्या प्रत्यनाचे फळ मिळाले नागरिकाच्यात जल्लोष
अखेर बारामती शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत वासियांना मिळाले हक्काचे घर..!
बिरजू मांढरे यांच्या प्रत्यनाचे फळ मिळाले नागरिकाच्यात जल्लोष
बारामती वार्तापत्र
प्रत्येकाच्या जीवनात स्वतःचे हक्काचे घर हवे असते पण त्यासाठी आयुष्य खर्च करावी लागते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दूरदृष्टी,सहकार्य व मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांचे प्रयत्न यांच्या मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळाले आहे त्यामुळे बेघर असलेल्या नागरिकाना घर मिळाल्याने प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहत होते.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांकरीता उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील लाभार्थ्यांना अखेर घरा चा ताबा मंगळवार दि.१५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून बारामती नगर पालिकेत सर्व लाभार्थ्यांना बोलाविण्यात आले होते, सुरुवातीला ड्राॅ द्वारे सदनिकांचे वाटप करण्याचे ठरले होते मात्र लाभार्थी नागरिकांनी एक मताने पूर्वी राहत असलेल्या नंबर प्रमाणे वाटप करण्याची सुचना केल्यानंतर त्याप्रमाणे एक दोघांच्या विरोध वगळता बहुमताच्या सहमतीनुसार सदनिका वाटप करण्यात आल्या.
यावेळी मुख्यधिकारी महेश रोकडे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर वसाहतीच्या लाभार्थ्यांनी जल्लोष केला फटाके वाजून स्वागत केले.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील गृह प्रकल्प ५ हजार ५०० चौ.मी. भूखंडावर उभारण्यात आला असून त्याअंतर्गत एकूण १०० सदनिकेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.१ चौ.मी. इतके आहे. संपूर्ण गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला आहे.