अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामतीतही ‘भोंगे’; राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालीसा लावत केली जयंती साजरी..
या महाआरतीला बारामतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामतीतही ‘भोंगे’; राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालीसा लावत केली जयंती साजरी..
या महाआरतीला बारामतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा लावत केली जयंती साजरी..
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हे भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालिसेचं पठण करण्याचे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. राज यांच्या या भूमिकेवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध संघटनांनी जोरदार टीका केली.
त्यानंतर बारामतीतदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसा लावण्यात आला. हनुमान जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यालगत असलेल्या पाणवठा वेस मारुती मंदिरात आरती करत स्तोत्र पठण केले.
त्यानंतर येथे लावण्यात आलेल्या भोंग्यावर हनुमान चालीसा वाजविण्यात आला. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी दिले होते. त्याच्या पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. या निर्णयाची बारामतीत अंमलबजावणी होते का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बारामतीत सामाजिक सलोखा गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो. आज हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा लावण्यात आला आहे. यातून कोणताही तणाव निर्माण करण्याचा उद्देश नाही, असे स्पष्टीकरण अॅड. पाटसकर यांनी यावेळी दिले.