स्थानिक

अजय ओमासे यांना अहिल्या रत्न पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती

अजय ओमासे यांना अहिल्या रत्न पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील लक्षशिला अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष अजय ओमासे यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभीजीत देवकाते पाटील यांनी आयोजित केली होती. या प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री तसेच मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते व
मनसे चे राज्य उपाध्यक्ष अँड .सुधीर पाटसकर ,भाजप राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, डॉ शशिकांत तरंगे,मारुतराव वणवे ,आदी उपस्तीथी मध्ये देण्यात आला.

लक्ष्यशिला फाउंडेशनने केलेल्या सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थापक अध्यक्ष अजय शिवाजी ओमासे यांना अहिल्या रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्काराने आत्मविश्वास वाढला व यापुढेही जोमाने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षणासाठी कार्यरत राहू असे अजय ओमासे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

Related Articles

Back to top button