इंदापूर तहसील कचेरी मध्ये युवकाचा पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
युवकाने प्रशासकीय कार्यालयात वाजवले फटाक्यातील सुतळी बॉम्ब

इंदापूर तहसील कचेरी मध्ये युवकाचा पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
युवकाने प्रशासकीय कार्यालयात वाजवले फटाक्यातील सुतळी बॉम्ब
इंदापूर : प्रतिनिधी
वीज तोडणी केल्यामुळे हैराण झालेल्या एका युवकाने आज (दि.१७) रोजी इंदापूर प्रशासकीय इमारतीमध्ये फटाक्यातील सुतळी बॉम्ब वाजवत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथील दीपक पारेकर ( अंदाजे वय वर्ष २५ ) नावाच्या युवकाने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सरकारने वीज माफी केली नाही,वीज तोड केली, वीज कनेक्शन तोडू नका म्हणत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सदरील घटनेची माहिती कळताच इंदापूर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत दीपक पारेकर यास ताब्यात घेतले.
कोरोनामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान,कवडीमोल दराने विकला गेलेला शेतमाल त्यामुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट अवस्था त्यातच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तोडली जात असलेली वीज कनेक्शन पहाता शेतातील उभी पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर जळू लागली असताना वीजबिले कोठून भरायची अशी परिस्थिती निर्माण झाली असून आज घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण इंदापूर तालुक्यात याच गँभीर घटनेचीच चर्चा होती.