अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवारांचे मोठे वक्तव्य आईने लिहिलेले पत्र ते तिने लिहिले का नाही शंका?
आम्हाला कधी २०-२५ वर्षात पत्र लिहिले नाही.
अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवारांचे मोठे वक्तव्य आईने लिहिलेले पत्र ते तिने लिहिले का नाही शंका?
आम्हाला कधी २०-२५ वर्षात पत्र लिहिले नाही.
बारामती वार्तापत्र
माझी आई आता ८७ वर्षाची आहे. तिला सभेला आणणे कितपत योग्य होते, हे मला समजत नाही. तिचा राजकारणासाठी वापर होतोय याचे मला वाईट वाटते. तिथे वाचलेले पत्र तिनेच लिहिले असावे का याबद्दल मी साशंक आहे.
कारण मी सुद्धा तिचाच मुलगा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू व मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भुमिकेबाबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सांगता सभेत उपस्थित राहत पत्राद्वारे संवाद साधला. या पार्श्वभुमीवर श्रीनिवास पवार यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ती त्यांची आई आहे तशी माझीही आई आहे. आईनेच ते पत्र लिहिले का याबद्दल मला शंका आहे. आम्हाला कधी २०-२५ वर्षात पत्र लिहिले नाही. ते तिने लिहिले असेल का, असा सवाल त्यांनी केला आहे.
तिच्या आजाराबाबत अजित पवार यांनी सभेत माहिती दिली. तिची ट्रिटमेंट सुरु आहे. ती थांबवून तिला आठ दिवसांसाठी इथे आणले गेले. ठिक आहे, तिला ते २५ तारखेनंतर पुन्हा ट्रिटमेंटसाठी नेतील. मी तर अशा परिस्थितीत तिला असा आग्रह केला नसता. मी तिला भेटलो होतो. तेव्हा ती मला म्हणाली की मी दमलीय रे, कंटाळली आहे या आजारपणाला. मला दोन पावले सुद्धा चालता येत नाहीत. तुला सभेला नेतील अशी विचारणाही मी केली होती, पण मी हलू शकणार नाही, असे ती म्हणाली होती. पण सोमवारच्या सभेत ती दिसल्याने मला आश्चर्य वाटले. सहाजिकच या वयात व्यक्ती परावलंबी असतो, तुम्ही बाकीचे समजून घ्या असे ते म्हणाले.
अजित पवारांसोबत असलेल्या बहिणींबाबत ते म्हणाले, माझे आणि मोठ्या बहिणीचे काही बोलणे झालेले नाही. आमची मोठी बहिण दादाचा व्यवसाय बघते. दादाच्या केसेस चालल्या आहेत, त्या ती बघते. महिलांना पैसे देऊन आणल्याचा अजित पवार यांच्या आरोपांवर ते म्हणाले, त्यांच्या सभेला कोण लोक होते हे पत्रकार म्हणून तुम्हाला माहित आहे. मी तर लोकसभेपासून या प्रवाहात आलो आहे. ते जुने खिलाडी असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले.